Last Updated: Saturday, February 16, 2013, 19:55
www.24taas.com, अहमदनगरगेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बजाजनगर मधील अमोल भगवान भाले या बावीस वर्षीय तरुणाचा खून झाल्याचं शुक्रवारी उघडकीस आले.
व्यावसायिक स्पर्धेतून जवळच्या मित्रांनीच त्याची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. अमोलचा मृतदेह नगर जिल्ह्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला आहे.
याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांनी शनि अमावास्येच्या निमित्तानं देवदर्शनासाठी अमोलला कारनं नेलं आणि त्याचा काटा काढला.
First Published: Saturday, February 16, 2013, 19:46