Last Updated: Tuesday, November 27, 2012, 10:39
www/24taas.com,पंढरपूरकार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात भक्तीचा मळा फुललाय. 3 लाख भाविक पंढरपुरात दाखल झालेत. विठुरायाच्या दर्शनासाठी कालपासूनच भाविकांनी रांगा लावल्यायेत. अवघी पंढरी पांडुरंगमय झालीय.
वारक-यांचं माहेरघर असलेल्या पंढरपुरात कार्तिकी वारीनिमित्त तीन लाख भाविक दाखल झालेत. परंपरेनुसार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापुजा होते. मात्र यावर्षी सोलापूरचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सपत्नीक पुजा केली.
वारक-यांचे प्रतिनिधी म्हणून कोल्हापूरच्या गगनबावडाच्या धर्मा कांबळे यांना शासकीय पुजेचा मान मिळाला. कार्तिक वारीनिमित्त राज्यातील चारा आणि पाण्याची समस्या सुटू दे असं साकडं विठूरायाला घातल्याचं पालकमंत्री ढोबळे यांनी सांगितलं.
First Published: Sunday, November 25, 2012, 11:04