Last Updated: Thursday, January 3, 2013, 16:36
www.24taas.com, अहमदनगरअहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यात सोनाई येथे तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ माजली आहे. एकाच वेळी तीन जणांचा खून झाल्याचे निदर्शनास आले आहे.
तिघेही सफाई कामगार आहेत. गणेशवाडीतील दरंदले वस्तीवर ते सफाईसाठी गेले होते. यापैकी एकाचा मृतदेह पोलिसांना काल सेफ्टी टँकमध्ये आढळून आला. त्याबाबत तपास करताना इतर दोन मृतदेह आढळून आले.
पोलिसांनी संशयावरुन प्रकाश दरंदले आणि रमेश दरंदले या दोघांना ताब्यात घेतलं आहे. हे हत्याकांड का घडलं असावं आणि यामागचा खरा सुत्रधार कोण याचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.
First Published: Thursday, January 3, 2013, 16:26