साईबाबांना ५२१ ग्रॅम वजनाचा सुवर्णहार! 521 grams Gold garland to Sai Baba

साईबाबांना ५२१ ग्रॅम वजनाचा सुवर्णहार!

साईबाबांना ५२१ ग्रॅम वजनाचा सुवर्णहार!
www.24taas.com, झी मीडिया, शिर्डी

शिर्डीच्या साईबाबांना दिल्लीतल्या सतीश लोहिया या साईभक्तानं 521 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार अर्पण केलाय. या सोन्याच्या हाराची किंमत 14 लाख रुपये असून या सोन्याच्या हारांमध्ये तब्बल 51 सोन्याची नाणी गोवण्यात आलीयत.

जून महिन्यातली ही चौथी सुवर्ण भेट ठरलीय. जून महिन्यात 80 लाखांचे सुवर्ण अलंकार साईभक्तांनी शिर्डीच्या साईचरणी अर्पण केलेत. यात 30 लाखांचा सोन्याचा हार, 23 लाखांचा सोन्याचा मुकूट, 9 लाख रुपयांचे सोन्याचे ग्लास आणि आज अर्पण केलेल्या 14 लाख रुपयांच्या हाराचा समावेश आहे. इच्छापूर्ती झाल्यानं ही भेट साईंना दिल्याचं सतीश लोहिया यांनी सांगितलंय.

दुपारच्या आरतीवेळी हा सोन्याचा हार साईंच्या मूर्तीवर भक्तांच्या इच्छेसाठी काही वेळासाठी चढवण्यात आला. हाराची उंची तीन फूट असून एका नाण्याचं वजन 10 ग्रँम आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, June 22, 2013, 08:11


comments powered by Disqus