Last Updated: Monday, February 11, 2013, 22:27
www.24taas.com, पुणेनवीन आर्थिक वर्षात पुणेकरांना महापालिकेला अधिक कर भरावा लागणार आहे. कारण, मिळकत करात सहा टक्यांनी वाढ करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आज पार पडली. त्यात करवाढीचा निर्णय घेण्यात आला.
पुणेकरांना आता प्रत्येक हजार रुपयामागे ६० रुपये अधिक मिळकत कर भरावा लागणार आहे. मिळकतकरात वाढ करत असताना, जकात वाढीचा प्रस्ताव मात्र फेटाळण्यात आलाय. सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये मिळकत करात वाढ करण्याच्या निर्णयावरून फूट पडली. कॉंग्रेसनं निर्णयाच्या विरोधात मतदान केलं. त्याचबरोबर शिवसेना आणि भाजपनंही या दरवाढीला विरोध केला.
मुख्य विरोधी पक्ष असलेल्या मनसेनं मात्र राष्ट्रवादीला साथ दिली. मनसेनं दरवाढीच्या बाजूने मतदान केलं... त्यामुळे पुणे महापालिकेत वेगळीच राजकीय समीकरणं या निमित्ताने पाहायला मिळाली.
First Published: Monday, February 11, 2013, 22:27