बारामतीत ८ वर्षाच्या मुलीवर अल्पवयीन मुलाचा बलात्कार, 8 year old girl Rape in baramati

बारामतीत ८ वर्षाच्या मुलीवर अल्पवयीन मुलाचा बलात्कार

बारामतीत ८ वर्षाच्या मुलीवर अल्पवयीन मुलाचा बलात्कार
www.24taas.com, बारामती

दिल्लीतील गँगरेपची घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्र्याच्या गावी बारामतीत ८ वर्षाच्या मुलीवर १७ वर्षाच्या मुलाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्याच्या गावातील मुली सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. बलात्कारींना फाशी दिली जावी अशी मागणी केली जाते मात्र अशा प्रकारच्या घटनांना रोखण्यात पोलीस अपयशी ठरत आहे.

अंगणात खेळणार्‍या आठ वर्षे वयाच्या मुलीला गोड बोलून कर्‍हा नदी परिसरात नेऊन बलात्कार केल्याची घटना बारामतीत घडली आहे. विशेष म्हणजे हे दुष्कृत्य करणारा मुलगाही अल्पवयीन असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. नदीपात्राजवळील एका निर्जनस्थळी त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडित मुलीने कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला.

त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलासह त्याच्या एका दहावर्षीय मित्रावरही गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची नावे जाहीर करण्यास पोलिसांनी नकार दिला.

First Published: Friday, December 21, 2012, 13:36


comments powered by Disqus