सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह, तळेगाव रेल्वेस्टेशनवरील घटना A deadbody found in Suitcase in Talegaon ra

सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह, तळेगाव रेल्वेस्टेशनवरील घटना

सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह, तळेगाव रेल्वेस्टेशनवरील घटना
www.24taas.com,झी मीडिया, पुणे

पुण्यातल्या तळेगाव दाभाडेच्या रेल्वे स्टेशनवर आज धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रेल्वे प्लॅटफॉर्मवर सापडलेल्या एका बेवारस सुटकेसमध्ये १६ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला.

प्लॅटफॉर्म दोनवर लाल रंगाची ही सुटकेस होती. मृतदेह हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला. हा प्रकार सकाळी साडेदहाची लोणावळा लोकल गेल्यानतर उघडकीस आला. रेल्वे पोलिसांनी श्वान पथकास पाचारण करून आरोपींचा माग घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आलं नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनजवळ प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर पुरूष स्वच्छतागृहाजवळ एक बेवारस लाल रंगाची ट्रॉली बॅग सापडली. या बॅगेत एका तरूणीचा मृतदेह आढळून आला. तरूणीचं वय १६ असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तरूणीचे हात आणि पाय नायलॉनच्या दोरीनं बांधलेल्या अवस्थेत आढळून आलं.

तरूणीनं पोपटी रंगाचा कुर्ता आणि हिरव्या रंगाची सलवार कमीज परिधान केलेली असून तिच्या नाकात उजव्याबाजूला सोन्याची रिंग आहे. यावरून पोलिसांनी ती दक्षिण भारतीय असल्याचा अंदाज बांधला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवलाय. ते पुढील तपास करत आहेत. मृत तरुणीची ओळख मात्र अद्याप पटलेली नाहीय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 7, 2014, 17:38


comments powered by Disqus