अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईत एकाचा बळी, a person dies during llegal building destuction

अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईत एकाचा बळी

अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईत एकाचा बळी

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामाच्याविरोधात सुरू असलेल्या कारवाईचा पहिला बळी गेलाय. वाल्हेकर वाडीत कारवाई दरम्यान घर पडल्यानं कैलास डिसले यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे हा मुद्दा आता आणखी पेटण्याची चिन्हं आहेत.

पिंपरी-चिंचवडची अतिक्रमण विरोधी मोहीम वादाच्या भोव-यात अडकत चाललीय. पालिकेनं शनिवारी वाल्हेकरवाडी इथं केलेल्या कारवाईत टेल्कोमध्ये काम करणा-या कैलास डिसले यांचं घर जमीनदोस्त झालं. त्याचा त्यांना एवढा धक्का बसला की त्यांना हृदय विकाराचा झटका आला... आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.... पै पै करून पैसा जोडला आणि घर बांधलं पण अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाईत ते डोळ्या देखत पडलं...अवघा संसार रस्त्यावर आला. हा धक्का सहन झाला नाही आणि त्यातच डिसले यांचा मृत्यू झाला.

दुसरीकडे विरोधकांनीही या कारवाई विरोधात आवाज उठवलाय. अनधिकृत बांधकामांविरोधातल्या कारवाईमुळे सर्वच जण हवालदिल झालेत..पण शहरात प्रचंड अनधिकृत बांधकामं आहेत हीसुद्धी वस्तूस्थिती आहे. पण या कारवाईत अनेकांची घरं उध्वस्त होतायत. त्यामुळं येत्या काही दिवसांत या मुद्द्यावरून शहरात प्रचंड उलथापालथ होणार हे नक्की.

First Published: Thursday, August 23, 2012, 14:49


comments powered by Disqus