अण्णा हजारेंच्या टीममध्ये आमिर खान, Aamir Khan in Anna Hazare team

अण्णा हजारेंच्या टीममध्ये आमिर खान

अण्णा हजारेंच्या टीममध्ये आमिर खान
www.24taas.com,राळेगणसिद्धी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आपल्या नव्या टिममध्ये बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आमिर खानला सहभागी करणार असल्याची बातमी कानावर आलीयं. नोव्हेंबर महिन्यामध्ये अण्णा हजारे आपल्या नव्या टिमची घोषणा करणार आहेत.

आमिरचा छोट्या पडद्यावरील ‘सत्यमेव जयते’ या वास्तविक कार्यक्रमामुळे अण्णा हजारे फार प्रभावित झाले होते. अण्णांना असं वाटतयं की आमिर खानच्या बोलण्याचा लोकांवर फार परिणाम होतो. तसेच प्रेक्षकवर्ग त्याचं ऐकतातही, त्यामुळे अण्णा आपल्या नव्या टिममध्ये आमिर खानला भष्ट्राचारविरोधी चळवळीत घेणार आहेत.

आमिर खान आणि अण्णा हजारे या दोघांकडून अजून तरी यासंर्भात काहीही माहिती उघड करण्यात आलेली नाहीय. अण्णांनी असं म्हटलयं की, २४ नोव्हेंबर आधी आपल्या नव्या टीमबद्दल ते काहीच बोलणार नाहीत. तसंही सध्या आमिर खान आपल्या आईसोबत हजयात्रेत व्यस्त आहे, त्यामुळे आमिरकडून काहीही उत्तरं मिळालेलं नाहीय.

अण्णांच्या गेल्या उपोषणाच्या वेळी आमिर खानने अण्णांना साथ दिली होती. तसेच आमिरनं घोषणाही केली होती की, अण्णांना आपण मदत केली पाहिजे, भष्ट्राचारविरोधाची ही लढाई एकट्या अण्णांची नसून संपूर्ण देशाची आहे. त्यामुळे सध्या ही चर्चा खूप जोरात आहे की, अण्णा हजारेंच्या टीममध्ये आमिर खान खरचं सहभागी होणार आहे का?

First Published: Saturday, October 27, 2012, 21:08


comments powered by Disqus