Last Updated: Saturday, February 16, 2013, 08:28
www.24taas.com, सोलापूर सोलापूर - हैदराबाद मार्गावर शनिवारी पहाटे एक भीषण अपघात झालाय. एका कारच्या धडकेत पाच वारकरी जागीच ठार तर नऊ जण जखमी झालेत.
तुळजापूर तालुक्यातील शहापूर गावचे हे वारकरी आहेत. १४ फेब्रुवारी रोजी माघ वारीसाठी या वारकऱ्यांनी आपलं गाव सोडलं होतं. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीला आतूर झालेल्या या वारकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी सोलापूर हैदराबाद मार्गावरील आंबिका ढाब्याजवळ मुक्काम ठोकला होता. शनिवारी पहाटे दोन वाजल्याच्या सुमारास ते पुढच्या मार्गावर चालू लागले होते. पण, पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या या वारकऱ्यांना पहाटे सव्वा चारच्या सुमारास एका ‘स्विफ्ट’ गाडीनं गाठलं. ही गाडी सरळ दिंडीत घुसली आणि हैदराबादहून येणाऱ्या या गाडीनं वारकऱ्यांना उडवलं.
या अपघातात पाच वारकरी जागीच ठार तर नऊ जण जखमी झालेत... जखमींना सोलापूरमधल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
First Published: Saturday, February 16, 2013, 08:27