पुण्यात अनधिकृत इमारतींवर कारवाई Action against unauthorized building

पुण्यात अनधिकृत इमारतींवर कारवाई

पुण्यात अनधिकृत इमारतींवर कारवाई
www.24taas.com, पुणे

पुण्यात इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर महानगरपालिकेला जाग आली आहे. धनकवडी, तळजाई, कात्रज परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येतेय.

मोठ्या पोलीस बंदोबस्तात अवैध बांधकामांवर हातोडा पडतोय. तळजाई पठारावर बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळून 11 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागं झालंय.

नियमबाह्य बांधकामे, पालिकेची परवानगी नसताना बांधकांमांना सुरुवात असं चित्र धनकवडी, कात्रज परीसरात दिसून येतंय. काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय नांदे याच्या मालकीची ही इमारत आहे. तर चंदर किसन राडोड हे या इमारतीचे बांधकाम करत होते.

First Published: Monday, October 1, 2012, 13:15


comments powered by Disqus