मुंबईनंतर पुण्यात अश्लिल पुतळे हटविण्याची मागणी, after Mumbai to demand to ban lingerie mannequins

मुंबईनंतर पुण्यात अश्लिल पुतळे हटविण्याची मागणी

मुंबईनंतर पुण्यात अश्लिल पुतळे हटविण्याची मागणी

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
मुंबई पाठोपाठ पुण्यातही मॅनीक्वीन्स हटवण्याची मागणी पुढे आली आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीने तुळशीबाग, लक्ष्मी रोड या परिसरात फिरून व्यापा-यांनी मॅनीक्वीन हटवण्यासाठी निवेदनं दिली.

त्याच बरोबर महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्तांना पत्रही दिलंय. पुणे महापालिकेच्या हद्दीत मॅनीक्वीन लावण्यास प्रतिबंध करण्यात यावा, अशी मागणी या पात्राद्वारे

शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे. शिवसेनेच्या मागणी मुळे मॅनीक्वीनचा विषय पुण्यात देखील गजाणार अशी चिन्हे आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, June 6, 2013, 20:38


comments powered by Disqus