पेटलेल्या विमानातून खडसे सुखरुप बाहेर, airplane fire, eknath khadse safe

पेटलेल्या विमानातून खडसे सुखरुप बाहेर...

पेटलेल्या विमानातून खडसे सुखरुप बाहेर...
www.24taas.com, पुणे

विरोधी पक्ष नेते एकनाथ आज थोडक्यात बचावलेत. जळगावहून पुण्याला विमानानं येत असताना खडसे प्रवास करत असलेल्या विमानाला आग लागली. पण, वैमानिकानं वेळीच प्रसंगावधान राखून मध्येच लँडिंग केल्यानं खडसेंसह या विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे जळगावचा आपला दौरा आटोपून पुण्याकडे रवाना झाले. पण, ते प्रवास करत असलेल्या विमानाच्या काही भागाला हवेतच आग लागली. कॉकपीटमूधन धूर निघू लागला. यावेळी हे विमान ११ हजार फूट उंचीवर होतं. त्यामुळे प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. यावेळी खडसे यांच्यासोबत पुण्याचे शहराध्यक्ष विकास मठकरीही आणि खडसेंची मुलगीही होती. पण, सुदैवान हे सगळे या अपघातातून बचावले

First Published: Friday, December 28, 2012, 22:14


comments powered by Disqus