अजितदादा पुन्हा होणार उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळात फेरबदल?, Ajit Pawar again Deputy Chief Minister

अजितदादा पुन्हा होणार उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळात फेरबदल?

अजितदादा पुन्हा होणार उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळात फेरबदल?
www.24taas.com, पुणे

सिंचनाची श्वेतपत्रिका मांडल्यानंतर लगेचच पुढील आठवड्यात मंत्रिमंडळचा विस्तार होणार आहे. त्यामुळं अधिवेशनापूर्वीच अजितदादांचे कमबॅक होण्याची शक्यता आहे.

अजित पावरांना कॅबिनेटमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं राष्ट्रवादी हिवाळी अधिवेशनात पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सिंचनाची श्वेतपत्रिका काढेपर्यंत कोणत्याही पदावर राहणार नाही, या प्रकरणी निष्पक्षपाती चौकशी व्हायला हवी.

यासाठी अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळेच लवकरात लवकर श्वेतपत्रिका मांडावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होती.

First Published: Wednesday, November 28, 2012, 20:54


comments powered by Disqus