अजित पवार नरेंद्र मोदींपेक्षा सक्षम - हसन मुश्रीफ, Ajit Pawar is better than Narendra Modi - Hassan Musrif

अजित पवार मोदींपेक्षा सक्षम - हसन मुश्रीफ

अजित पवार मोदींपेक्षा सक्षम - हसन मुश्रीफ
www. 24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर

राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाची दिवास्वप्न पडू लागल्याचे दिसून आले आहे. कोल्हापूर येथील कार्यक्रमात पक्षातील ज्येष्ठ नेते आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तुलाना गुजरातचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी केलेय. अजितदादांना मुख्यमंत्री केल्यास गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींपेक्षा ते चांगलं काम करू शकतात असं मुश्रीफ यांनी म्हटलंय.

मुश्रिफ यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला थेट मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली आहेत, असं चित्र निर्माण झालंय. हसन मुश्रीफ यांनी हे वक्तव्य करण्याआधी माझं म्हणणं फारसं सिरीयसली घेऊ नका असंही सांगितलं, हे विशेष.

मध्यंतरी अजित पवारांनी बेताल वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज्यातील जनतेची चेष्टा केल्याने अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. त्यानंतर अजित पवारांनी राज्यातील जनतेची माफी मागितली. तसेच यापुढे बोलताना विचार करीन असेही सांगितले. असे असताना आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री अजित पवारांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचे पाहायचेय. त्यांना स्पर्धा करायचीय ती गुजरात राज्याशी. मात्र, या वक्तव्यानंतर काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याची राष्ट्रवादी उत्तरे देईल का, असा सवाल विचारण्यात येत आहे.

अजितदादांची तुलना नरेंद्र मोदींशी केल्याने काही प्रश्न उपस्थित होतात

१) नरेंद्र मोदी हे उत्तम मुख्यमंत्री आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस मान्य करतंय का?
२) नरेंद्र मोदींपेक्षा जास्त चांगला विकास करायचा असेल तर उपमुख्यमंत्रीपदावरून राज्याचा विकास होऊ शकत नाही का?
३) राष्ट्रवादीकडे राज्यातली महत्त्वाची खाती आहेत, मग त्यांनी राज्याचा विकास करण्यापासून कोणी रोखलंय?
४) मोदींच्या गुजरातपेक्षा महाराष्ट्र विकासात सध्या मागे आहे हे राष्ट्रवादीला मान्य आहे का?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, June 22, 2013, 18:09


comments powered by Disqus