Last Updated: Sunday, February 23, 2014, 17:33
www.24taas.com, झी मीडिया, इंदापूरउपमुख्यमंत्री अजित पवारांनी मीडियाचा चांगलाच धसका घेतलाय.. याचीच प्रचिती इंदापूरमधल्या एका कार्यक्रमात आली. बोलता बोलता एखादा शब्द गेला तर तर माझ्याच शब्दांनी माझी वाट लागते अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी सावध पवित्रा घेतला.
अजित पवारांना उपरती …ती देखील इंदापूर मध्ये. आज इंदापूर येथील सराटी येथे एका शिक्षण संस्थेच्या इमारतीच्या उदघाटन प्रसंगी अजित पवार म्हणालेत, बोलता बोलता जर शब्द गेला तर माझ्याच शब्दाने माझी वाट लागते. तुम्ही हसता टाळ्या वाजविता. इथेच माझे शब्द वाढतात आणि माझी चांगली वाट लागते.
यापूर्वी इंदापूर तालुक्यात निबोडी येथील वादग्रस्त विधानाने अजित पवारांना जाहीर माफी मागावी लागली होती. तर कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कृष्णा काठच्या समाधी जवळ आत्मचिंतन करण्याची वेळ आली होती तशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून आज त्यांनी बोलताना इंदापूर मध्ये सावध भूमिका घेतली. त्यामुळे अजित पवार मीडियाला घाबरले, अशी चर्चा सुरू होती.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, February 23, 2014, 17:27