अजित पवारांच्या नाट्यपरिषद पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या, Ajit Pawar Not Satisfied to natyasamyelan

अजित पवारांच्या नाट्यपरिषद पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

अजित पवारांच्या नाट्यपरिषद पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
www.24taas.com, बारामती

नाट्यसंमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात अजित पवार यांनी नाट्य परिषदेच्या पदाधिका-यांना कानपिचक्या दिल्या. सरकारनं नाट्य परिषदेला पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचं जाहीर केल आहे.

मात्र अनेक दिवसांनंतरही या निधीचा वापर कसा करणार हे नाट्य परिषदेनं सांगितलेलं नाही असं सांगत नाराजी व्यक्त केली. नाट्यसंमेलनासाठी जुन्य़ा जाणत्या कलावंताना निमंत्रणं दिली जात नाहीत असंही ते यावेळी म्हणाले.

93 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला आज बारामतीत सुरूवात झाली. कविवर्य मोरोपंतनगरीत उभारलेल्या भव्य सभागृहात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचं उदघाटन झालं. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आहेत. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते.

प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, खासदार सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते. स्वागताध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, नाट्य परिषदेचे अध्यक्ष हेमंत टकले यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाचं नियोजन केलं आहे

First Published: Saturday, December 22, 2012, 13:13


comments powered by Disqus