तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई, अजित पवारांचे संकेत, ajit pawar on mns todfod

तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई -अजित पवार

तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई -अजित पवार
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

मनसेनं सुरू केलेल्या टोल विरोधातल्या आंदोलनावर आता सरकारनं कारवाईचे संकेत दिले आहेत. टोलची तोडफोड करून कायदा हातात घेणा-यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय.

अजित पवार यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता, म्हटलंय भाषणांमधून हिंसेला प्रवृत्त करणा-यांवरही कारवाई करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. अजित पवार यांनी पुण्यात बोलतांना हे संकेत दिले आहेत.

यावरून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यातील राजकीय जुगलबंदी रंगणार असल्याचं चित्र आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 27, 2014, 19:11


comments powered by Disqus