Last Updated: Sunday, January 27, 2013, 19:22
www.24taas.com, पुणेमुख्यमंत्री खोटं बोलत असल्याची जोरदार टीका करत अजित पवारांनी खळबळ उडवून दिली आहे. राज्य बँकेवर प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतरच लायसन्स मिळालं, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. याचा समाचार घेताना, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना खोटं ठरवलं.
बँकेच्या लायसन्स संदर्भात मुख्यमंत्री देत असलेली माहिती साफ चुकीचे आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. ज्यांनी संस्थेचं नुकसान केलंय, त्यांना माफी देता कामा नये, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता लगावला. आपण असं बोलल्यावर त्यांची ब्रेकिंग न्यूज झालीच म्हणून समजा, असंही ते म्हणाले.
दरम्यान, एकत्र लढण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्य असल्याचं गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी म्हटलंय. त्याच वेळी `राष्ट्रवादी काँग्रेसला कमजोर समजलं जातं आणि स्वबळाची भाषा काँग्रेसकडूनच केली जाते`, असा टोलाही त्यांनी काँग्रेस नेत्यांना लगावलाय.
First Published: Sunday, January 27, 2013, 19:19