Last Updated: Wednesday, November 21, 2012, 13:07
www.24taas.com, पुणेकसाबला आज सकाळी फार गुप्ततेत फाशी देण्यात आली, असली तरी काही बातम्या आता समोर येत आहे. कसाबला फाशी देताना विचारण्यात आले की, अंतीम इच्छा काय आहे. त्यावर त्याने आपली अंतीम इच्छा काहीच नाही, किंवा आपण काय करू इच्छितो असे त्याने काहीच सांगितले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
अल्ला कसम ऐसी गलती दोबारा नही करूंगा, असे त्याचे अखेरचे शब्द होते. निरविकार चेहऱ्याने तो फाशीला सामोरा गेल्याचे जेल प्रशासनाने सांगितले.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कसाबच्या दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर येरवडा जेल प्रशासनाने योग्य ती कारवाई केल्याचे जेलमधील सूत्रांनी सांगितले.
कसाबला फाशी देण्यापूर्वी त्याने संपूर्ण माहिती दिल्याचेही जेल प्रशासनाने न्यूज चॅनल्सला सांगितले. कसाबला फाशी देण्यात आल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना द्यावी अशी विनंती जेल प्रशासनाने हायकोर्टाला दिली आहे.
First Published: Wednesday, November 21, 2012, 09:56