Last Updated: Sunday, January 27, 2013, 13:07
www.24taas.com, अहमदनगरमिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननेही नंदी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. भ्रष्टाचाराला स्वतः ती व्यक्तीच जबाबदार असते, असं सांगत आमीर खानने भ्रष्टाचाराच्या प्रवृत्तीवर टीका केली आहे.
अहमदनगरमध्ये स्नेहालय संस्थेला भेट देण्यासाठी आलेल्या आमीर खानने पत्रकारांशी बोलताना आपली स्पष्ट भूमिका मांडली. समाजशास्त्रज्ञ आणि लेखक आशिष नंदी यांनी काल जयपूर साहित्य संमेलनात दलित आणि ओबींसीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं वाद निर्माण झाला आहे.
दलित आणि ओबीसी सर्वाधिक भ्रष्टाचारी असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यासाठी त्यांनी पश्चिम बंगाल राज्याचे उदाहरण दिलं होतं. बंगालच्या सत्तेत दलित, ओबीसी नसल्यामुळं तिथं भ्रष्टाचार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र देशभऱातून या वक्तव्यावर टीका होऊ लागल्यानंतर नंदींनी माफी मागितलीय. तसंच त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
First Published: Sunday, January 27, 2013, 13:04