सतीश शेट्टी हत्या प्रकरण : नार्को टेस्टची मागणी, andhlkar ask for narko test, in satish shetty murder case

सतीश शेट्टी हत्या प्रकरण : नार्को टेस्टची मागणी

सतीश शेट्टी हत्या प्रकरण : नार्को टेस्टची मागणी
www.24taas.com, पुणे

आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्याप्रकरणात स्वतः ची नार्को टेस्ट कली जावी, अशी मागणी निवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी कोर्टात अर्ज देखील केला आहे.

आंधळकर यांच्याबरोबर इतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांनीदेखील स्वतःची नार्को टेस्ट करण्याची मागणी कोर्टाकडे केली आहे. रमेश नाळे, नामदेव कौठाळे आणि कैलास लबडे अशी त्यांची नावे आहेत. सतीश शेट्टी हत्या प्रकरणाचा तपास सुरवातीला आंधळकर आणि त्यांच्या याच सहकाऱ्यांकडे होता.

काही दिवसांपूर्वी सीबीआयने सतीश शेट्टी हत्येप्रकरणात छापे टाकले होते. त्यात आंधळकर आणि त्यांच्या या सहकार्यांचा देखील समावेश होता. सीबीआयने आंधळकर आणि त्यांच्या या सहकाऱ्यांना या प्रकरणात संशयित ठरवलं आहे. तसंच, आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी सध्या सुरु असलेला तपास म्हणजे चोराला सोडून, संन्याशाला फाशीला देण्याचा प्रकार असल्याचं सांगत निवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांनी तपासावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.

First Published: Thursday, November 8, 2012, 11:45


comments powered by Disqus