‘उदे गं अंबे उदे... टोल रद्द कर गं माते’ , andolan against toll in kolhapur

‘उदे गं अंबे उदे... टोल रद्द कर गं माते’

‘उदे गं अंबे उदे... टोल रद्द कर गं माते’
www.24taas.com, कोल्हापूर

राज्यभरातच टोलचा मुद्दा गाजत असताना कोल्हापुरातही टोलविरोधात असंतोष आहे. वारंवार आंदोलन करूनही टोलबाबत राज्यसरकार कारवाई करत नसल्यानं कोल्हापूरच्या महिलांनी थेट आता आंबाबाईचाच दरवाजा ठोठावलाय.

परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे सरकारला काही सामान्यांचं म्हणणं ऐकू येईनासं झालंय. त्यामुळेच कोल्हापूरच्या महिलांनी टोल रद्द होण्यासाठी महालक्ष्मीलाच साकडं घातलंय. ‘राज्य सरकारला सदबुद्धी दे आणि टोल रद्द हेऊ दे’ असं साकडं घालत महालक्ष्मीला महिलांनी अभिषेक घातलाय. कोल्हापूर शहरात आय.आर.बी कंपनीमार्फत २२० कोटी रुपयांचे रस्ते विकास प्रकल्पाअंतर्गत रस्ते बांधण्यात आले आहेत. मात्र, हे रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप कोल्हापूरकरांनी केलाय.

राज्यात सर्वाधिक कर कोल्हापूर जिल्हाकडून मिळतो. मात्र, राज्यातल्या इतर शहरांच्या तुलनेत कोल्हापूरच्या विकासाकडे लक्ष दिलं जात नसल्याचा आरोपही नागरिकांनी केलाय. त्यामुळं टोल देणार नसल्याची भूमिका कोल्हापूरकरांनी घेतलीय.

First Published: Friday, January 18, 2013, 16:51


comments powered by Disqus