खबरदार, परदेशींची बदली केली तर...,Anna Hazare defending corporation commissioner

खबरदार, परदेशींची बदली केली तर...

खबरदार, परदेशींची बदली केली तर...

www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रीकर परदेशींच्या समर्थनासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. श्रीकर परदेशींची बदली होणार अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे.

श्रीकर परदेशींवर कारवाई केल्यास मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन उभं करू असं अण्णांनी म्हटलंय. आण्णा हजारेंनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना पत्र लिहून हा इशारा दिला आहे. श्रीकर परदेशींनी पिंपरी चिंचवडच्या अनधिकृत बांधकामाविरूद्ध कारवाईचा धडाकाच सुरू केला होता. त्यामुळे काही स्थानिक राजकिय नेत्यांकडून त्यांच्या बदलीसाठी आग्रह धरला जात आहे.

पुण्याच्या आणि पिंपरी-चिंचवडच्या काही नागरी संघटनांशी आण्णांची या संदर्भात भेट घेतली होती. श्रीकर परदेशींच्या बदलीमुळे नाराजी आहे लोकांमध्ये नाराजी निर्माण होईल, असं आण्णांना वाटतंय. 'श्रीकर परदेशी हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांच्या विरोधात एकही तक्रार नाही. त्यामुळे श्रीकर परदेशींना आयुक्तपदाचा पुर्ण कार्यकाळ मिळावा' अशी मागणी आण्णा हजारेंनी केली आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 25, 2014, 18:56


comments powered by Disqus