भैय्या देशमुख यांच्यावर मध्यरात्री हल्ल्याचा प्रयत्न Attack on Bhayya Deshmukh

भैय्या देशमुख यांच्यावर मध्यरात्री हल्ल्याचा प्रयत्न

भैय्या देशमुख यांच्यावर मध्यरात्री हल्ल्याचा प्रयत्न
www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर

गेल्या 97 दिवसांपासून आझाद मैदानात पाण्यासाठी आंदोलनासाठी बसलेल्या सोलापूरच्या भैय्या देशमुख यांच्यावर मध्यरात्री हल्ल्याचा प्रयत्न झाला.

आझाद मैदानात आंदोलनस्थळी भैय्या देशमुख आणि त्यांचे कार्यकर्ते झोपलेले होते. रात्री दोनच्या सुमारास चेंबूरमध्ये राहणारा सुशील विश्वासराव नावाची व्यक्ती अचानक घटनास्थळी जावून भैय्या देशमुखांना शिविगाळ करु लागली. तसंच त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करु लागली. आंदोलन मागे न घेतल्यास जीवे मारण्याची धमकीही त्यानं दिली. आंदोलक शेतकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

पोलिसांनी याबाबत सुशील विश्वासराव याच्याविरोधात गुन्हा नोंदवून सोडून दिले. सुशील विश्वासराव हा दारु पिऊन गोंधळ घातल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. भैय्या देशमुखांनी आपल्या जीवितला धोका असल्यानं संरक्षण देण्याची मागणी केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, May 12, 2013, 17:31


comments powered by Disqus