Last Updated: Sunday, January 20, 2013, 22:16
www.24taas.com, पिंपरी-चिंचवडपिंपरी-चिंचवडमध्ये आरटीआय कार्यकर्ते विलास मेडगीरी यांच्यावर हल्ला करण्यात आला. जखमी झालेल्या मेडगिरींवर यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विलास मेडगिरी हे भाजप नगरसेविका वर्षा मेडगिरी यांचे पती आहेत. भोसरी परीसरात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. माहितीच्या अधिकारात मडेगिरी यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनेक गैरप्रकार उघडकीस आणले होते. तसेच, त्यांनी माहितीच्या अधिकारात महापालिकेत अनेक अर्ज देखील केले आहेत.
त्यातूनच त्यांच्यावर हल्ला झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोदवण्यात आला आहे..
First Published: Sunday, January 20, 2013, 22:16