साईंच्या दानरूपातील वस्तूंचा लिलाव Auction at Shirdi

साईंच्या दानरूपातील वस्तूंचा लिलाव

साईंच्या दानरूपातील वस्तूंचा लिलाव
www.24taas.com, शिर्डी

साईबाबांना दान रुपानं आलेल्या सोन्या, चांदी आणि हिरे मोत्यांच्या वस्तूंचा लिलाव साईबाबा संस्थान तीन टप्यात करणार आहे. लिलावामध्ये कुणीही साईभक्त सहभागी होऊ शकणार असून लिलावात सहभागी होण्यासाठी १० हजाराची अनामत रक्कम भरणं आवश्यक आहे.

लिलावाच्या वस्तूंची माहिती साईसंस्थानच्या वेबासाईटवर देण्यात येईल. सोन्या आणि चांदीच्या सुमारे 3 कोटींच्या वस्तू लिलावामध्ये उपलब्ध असणार आहे. चादींच्या ३० वस्तू, चांदीचे मुकुट, सिहासन, चांदीच्या फ्रेम्स, चांदीच्या पादुका, ४ ताटे ८ मुकुट, १०२ चांदीची नाणी आणि २२ किलो चांदी लिलावात ठेवण्यात येणार आहे.

तसंच ८ किलो सोन्याच्या वस्तू, १० सोन्याचे मुकुट, ३ चेन्स, सोन्याचे ताट, ३ सोन्याच्या वाटया अशा महत्वाच्या गोष्टींचा समावेष आहे. तसंच १.१७ कोटींचे हिरे जडीत पेंडंटही लिलावात ठेवले जाणार आहे. या व्यतिरिक्त ५२ हिरे, माणिक, मोती अशा वस्तूंचा समावेश आहे.

First Published: Tuesday, October 9, 2012, 20:58


comments powered by Disqus