पंतप्रधानांनी पिंपरी-चिंचवडला दिलेला पुरस्कार मॅनेज्ड! Award from PM Managed?

पंतप्रधानांनी पिंपरी-चिंचवडला दिलेला पुरस्कार मॅनेज्ड!

पंतप्रधानांनी पिंपरी-चिंचवडला दिलेला पुरस्कार मॅनेज्ड!
www.24taas.com, पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड शहराला गेल्या वर्षी जेएनएनयूआरएम (JNNURM) च्या अंतर्गत केलेल्या कामा मूळ पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते केंद्राचा बेस्ट सिटी चा पुरस्कार मिळाला होता. पण हा पुरस्काराच मॅनेज करून घेतला होता, असा गंभीर आरोप करण्यात आलाय. तो ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड मधले सर्वात वरिष्ठ नगरसेवक आणि माजी महापौर आर एस कुमार यांनी… त्यामुळ पिंपरी चिंचवड मधल राजकीय वातावरण अचानक पणे ढवळून निघालंय…

पिंपरी चिंचवड मधल्या विकास काम मूळ शहराला बेस्ट सिटी पुरस्कार प्राप्त झाला. त्याच चांगलाच भांडवल करत अजित दादा पासून राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी चांगलाच भांडवल करत महापालिकेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवळ. एवढच नाही तर इतर ठिकाणीही या शहराच उदाहरण देत राष्ट्रवादीन प्रचार केला. पण हेच बेस्ट सिटी चा पुरस्कार मॅनेज करून घेतल्याची शंका येत असल्याच वक्तव्य राहत्रावाडी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड मधले सर्वात ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी महापौर आर एस कुमार यांनी केलय. ते ही महापालिका सभागृहात. आणि सभाग्रहा बाहेरही ते ठाम आहेत. जर जेयेनयेनयूआरएम च्या अंतर्गत अजून ३० टक्केही काम झाली नसतील तर पिंपरी चिंचवड ला हा पुरस्कार मिळाला कसा ही शंका येत असल्याच आर एस कुमार यांनी म्हटलंय.


पक्ष कारवाई करेल का याची भीती नाही असही आर एस कुमार यांनी म्हटलंय. ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेस ने बेस्ट सिटी च्या जोरावर महापालिका निवडणूक असो वा इतर कोणत्या नवडनुका सर्वत्रच त्याचा गावगावा केला . पण पक्ष्याच्या एका ज्येष्ठ नेत्यान थेट या पुरस्कारावरच प्रश्न चिन्ह निर्माण केल्यान राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र चांगलीच गोची झाली आहे.

First Published: Wednesday, March 20, 2013, 20:27


comments powered by Disqus