क्रांतीवीर बाबाराव सावरकरांच्या स्मारकाला आग babarao savrkar smarak fire in sangli

क्रांतीवीर बाबाराव सावरकरांच्या स्मारकाला आग

क्रांतीवीर बाबाराव सावरकरांच्या स्मारकाला आग

www.24taas.com, झी मीडिया, सांगली

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांच्या सांगलीतल्या स्मारकांमध्ये अज्ञातांनी आग लावली असल्याचं सांगण्यात येत आहे.

सावरकर स्मारक समिती आणि पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं आहे.

यामध्ये दुर्मिळ ग्रंथ, पुस्तकं, पत्रव्यवहार, छायाचित्रं अशी सुमारे दीड हजारांची ग्रंथसंपदा जळून खाक झाली.

पुस्तकं आणि फर्निचर मिळून सुमारे दोन लाखांचं नुकसान झालंय. अज्ञातांनी मध्यरात्रीनंतर कुलुप तोडून आत प्रवेश केला.

स्मारकातलं ग्रंथालय जाळून टाकण्यात आलं. रस्त्याने जाणा-या एका व्यक्तीला स्मारकातून येणारे धुराचे लोट दिसल्यावर त्याने पोलिसांत माहिती दिली.

स्मारक समिती आणि पोलिसांनी या घटनेनंतर नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 11, 2014, 21:25


comments powered by Disqus