Last Updated: Saturday, January 11, 2014, 22:36
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूरकोल्हापुरात टोलविरोधी आंदोलन मागे घेण्यात आले आहे. कामगारमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलनाची तलवार म्यान झाली. कोल्हापूरकरांना टोलमुक्ती मिळणार का याकडं आता नजरा लागल्या आहेत.
कोल्हापूरकरांना टोलमुक्ती मिळण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या ६ दिवसांपासून सुरु असलेलं टोलविरोधी आंदोलन आता मागे घेण्यात आलंय.. कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय..सहा दिवसांपासून या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.. त्याचबरोबर या आंदोलनात ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील यांनीही सहभाग घेतला होता.
सहाव्या दिवशी तर शाळकरी विद्यार्थिनीनेही लाक्षणिक उपोषण करुन टोलला विरोध केला होता.. या आंदोलनाची अखेर दखल घेत कामगारमंत्री मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी टोल रद्द करण्याचं आश्वासन उपोषणकर्त्या आंदोलकांना दिलं आणि त्यानंतर आंदोलनाची ही तलवार म्यान करण्यात आली.. त्यामुळं आता कोल्हापूरकरांना टोलपासून मुक्ती मिळणार का याकडं सा-याचं लक्ष लागलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Saturday, January 11, 2014, 22:30