राजमाची परिसरात रात्री ट्रेकिंगला बंदी?, ban on night trekking in rajmachi

राजमाची परिसरात रात्री ट्रेकिंगला बंदी?

राजमाची परिसरात रात्री ट्रेकिंगला बंदी?

www.24taas.com, झी मीडिया, पुणे

लोणावळा परिसरात ट्रेकिंगसाठी येणाऱ्या मुंबई - पुण्यातल्या ट्रेकर्ससाठी महत्त्वाची बातमी... लोणावळा परिसरातल्या राजमाची आणि परिसरात यापुढे रात्रीच्या वेळी ट्रेकिंग लवकरच बंद हाऊ शकतं.

सुरक्षेच्या कारणावरुन या परिसरात रात्रीच्या वेळी ट्रेकिंगला बंदी घालण्याचा विचार पुणे ग्रामीण पोलीस करतायत. हा संपूर्ण परिसर निर्जन आणि जंगलानं वेढलेला आहे. मात्र, ट्रेकर्स विशेषतः मुलींच्या सुरक्षेसाठी या परिसरात सुरक्षेच्या कोणत्याही उपयोजना नाहीत.

त्यामुळे रात्रीच्या वेळी ट्रेकिंग बंद करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या परिसरात पेट्रोलिंग सुरु केलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 19, 2014, 12:37


comments powered by Disqus