वसुलीसाठी पालिकेकडून बँड, बाजा, बरात! band, baja, barat by pune mahanagarpalika

वसुलीसाठी पालिकेकडून बँड, बाजा, बरात!

वसुलीसाठी पालिकेकडून बँड, बाजा, बरात!
www.24taas.com, पुणे

मिळकत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी पुणे महापालिकेनं अनोखी शक्कल लढवलीय. ही थकबाकी न भरणाऱ्याऱ्यांची मात्र दारासमोर बँड, बाजा, बरात घेऊन आलेल्या पालिकेला पाहून चांगलीच धांदल उडाली.

पुणे महापालिकेचा सुमारे ४०० कोटींचा मिळकत कर थकीत आहे. या थकबाकीचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर होत आहे. त्यामुळे हे आर्थिक वर्ष संपायच्या आत म्हणजेच ३१ मार्चपर्यंत जास्तीत जास्त वसुली करण्याची मोहीम हाती घेण्यात आली... आणि पालिकेनं चक्क या थकीतदारांच्या घरासमोर वरात काढण्याचा अनोखा निर्णय घेतला. थकबाकीदाराच्या दारासमोर बँड वाजवत सध्या ही मिळकत कराची वसुली पालिकेनं केलीय.

या अनोख्या मोहिमेसाठी पाच बँड पथकंही नियुक्त करण्यात आली आहेत. या मोहिमेद्वारे पालिका दिवसभरात तब्बल दोन कोटींची थकबाकी वसूल करण्यात यशस्वी झाली.

First Published: Saturday, March 16, 2013, 08:12


comments powered by Disqus