घरफोड्या करणारी नवरा-बायकोची जोडी जेरबंद, banty and bubly arrested in pune

घरफोड्या करणारी नवरा-बायकोची जोडी जेरबंद

घरफोड्या करणारी नवरा-बायकोची जोडी जेरबंद


www.24taas.com, नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे
घरफोड्या करणारी नवरा बायकोची जोडी पुणे पोलिसांनी जेरबंद केलीय. घर फोडी करण्याची हाफ सेंच्युरी या जोडप्यानं पूर्ण केलीय. विशेष म्हणजे दिवसाढवळ्या ही जोडी घरफोड्या करायची. पाहुयात बंटी आणि बबलीचा हा कारनामा...

पुण्यातल्या दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात असलेला हा मयुर भुंडे….. दत्तवाडी पोलिसांनी मयुरला काही दिवसांपूर्वी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली. घरफोडीच्या गुन्ह्यात मयुरने चक्क हाफ सेंच्युरी पूर्ण केलीय. पण हे गुन्हे काही त्याने एकट्यानेच केलेले नाहीत. तर, त्यात त्याला बरोबरीची साथ होती ती त्याची पत्नी पूजा भुंडे उर्फ बबलीची… बंटी-बबलीच्या या जोडीने दिवसाढवळ्या या सगळ्या चो-या केल्या असल्याची माहिती दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर यांनी सांगितले.

घरफोडीची हाफ सेंच्युरी पूर्ण करूनही बंटी-बबलीची ही जोडी पोलिसांच्या काही हाती लागत नव्हती. अखेर घरफोडीच्या गुन्ह्यांचा घडा भरला आणि बंटी - बबलीची ही जोडी दत्तवाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकली. एकट्या दत्तवाडी पोलिसांच्या हद्दीत या जोडीनं आठ गुन्हे केलेत.

सोनसाखळी चोरीच्या घटना पुण्यात मोठ्या प्रमाणात वाढल्यायत. त्याला लगाम घालणं पुणे पोलिसांना अजून शक्य झालेले नाही. दाभोळकरांच्या हत्येच्या तपासातही पुणे पोलिसांचे हात अजून रिकामेच आहेत. अशा स्थितीत घरफोडी करणारी बंटी - बबलीची ही जोडी पकडली गेल्यानं, पुणे पोलिसांना काहीसा दिलासा नक्कीच मिळाला असेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 17, 2013, 21:02


comments powered by Disqus