Last Updated: Thursday, October 25, 2012, 22:13
www.24taas.com, अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात गोरेगावमध्ये एका विहिरीत पडलेल्या नऊ महिन्याच्या बिबट्याला तब्बल सात तासांनंतर बाहेर काढण्यात वन खात्याला यश आलंय.
गेल्या अनेक दिवसांपासून गोरेगावमध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. आज सकाळी एकाच वेळी दोन बिबटे गावात शिरले आणि फिरत असताना सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यापैकी एक बिबट्या या विहिरीत पडला तर दुसरा बिबट्या तिथून पळून गेला. भाऊ पातारे हा शेतकरी आपल्या विहिरीजवळ गेला असता त्याला विहिरीत बिबट्या दिसला. त्याने लगेचच वन खात्याला याची माहिती दिली.
वन अधिकाऱ्यांनी पिंजरा विहिरीत सोडून या बिबट्याला जेरबंद केलं. या बिबट्यासोबत असलेला दुसरा बिबट्या म्हणजे याच बिबट्याची आई असल्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून त्याचा शोध सुरू आहे.
First Published: Thursday, October 25, 2012, 22:13