Last Updated: Friday, January 25, 2013, 09:43
www.24taas.com, लोणावळा लोणावळ्यात बिग बॉसचा स्टुडिओ जळून खाक झाला आहे. आज पहाटे पावणेपाचच्या सुमारास स्टुडिओला आग लागल्याचं निदर्शनास आलं. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येतं आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र आग भीषण असल्याने बिग बॉसचा स्टुडिओ जळून खाक झाल्याचे समजते.
अग्निशमन आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत आहे. लोणावळ्यातील इव्हिक्शन स्टुडिओला ही भीषण आग लागली होती. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. नुकताच काही दिवसापूर्वीच बिग बॉसचं ६वं पर्व पार पडलं, लोणावळ्यातील ह्या घरात बिग बॉसचे ६ पर्व झाले आहेत.
नुकताच सहावं पर्व पार पडल्याने सध्या त्या घरात कोणीही नसल्याने फारच मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र `बिग बॉस`चा घरातील असणाऱ्या अनेक आठवणी मात्र आगीत जळून खाक झाल्या आहेत.
First Published: Friday, January 25, 2013, 09:27