गॅस दरवढीवर येरवड्याची मात, कैद्यांना बायो-गॅसची साथ bio-gas for Yerwada Jail

गॅस दरवढीवर येरवड्याची मात, कैद्यांना बायो-गॅसची साथ

गॅस दरवढीवर येरवड्याची मात, कैद्यांना बायो-गॅसची साथ
www.24taas.com, पुणे

नुकत्याच झालेल्या गॅस दरवाढीमुळे पुण्यातल्या येरवडा जेलचं वार्षिक बजेट कोलमडणार आहे. या पार्श्वभूमीवर जेलमधल्या साडेतीन हजार कैद्यांच्या स्वयंपाकासाठी जैविक इंधन वापरण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्कच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यामुळे इंधनावरचा ७० टक्के संभाव्य खर्च कमी होईल.

पुण्यातलं येरवडा मध्यवर्ती कारागृह... कैद्यांची संख्या सुमारे साडे तीन हजार......दिवसाकाठी एकूण ७ हजार लोकांचा स्वयंपाक... या स्वयंपाकासाठी एलपीजी सिलिंडरचा वापर करण्यात येतो. त्यामुळे महिन्याकाठी किमान ७०० ते ८०० सिलिंडर्स लागतात. आता सहा सिलिंडरनंतर सबसिडी उठवण्याचा निर्णय सरकारनं घेतला. परिणामी जेलच्या अंदाजपत्रकातला खर्च तब्बल अडीच पटीनं वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर इंधनावरचा खर्च कमी करण्यासाठी जैविक कोळसा आणि जैविक गॅसचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जेलमध्येच निर्माण होणा-या जैविक कचऱ्याचा उपयोग कच्चा माल म्हणून केला जाणार आहे.


सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्कच्या सहकार्यानं हा प्रकल्प राबवण्यात येतोय. पुढच्या ३ महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित होईल. जैविक इंधनाच्या वापरामुळे येरवडा जेलच्या इंधनाचा खर्च सुमारे ७० टक्क्यांनी कमी होणार आहे.

येरवडा जेलच्या ताब्यात २५० एकर जमीन आहे. या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. लवकरच टिश्यू कल्चरवर आधारित केळीची लागवड याठिकाणी केली जाणार आहे.

First Published: Tuesday, October 9, 2012, 22:47


comments powered by Disqus