मुंडेंची पंकजा पोलिसांच्या ताब्यात!, BJP Protest against Mumbai gang rape pankaja munde in possession of pune police

मुंडेंची पंकजा पोलिसांच्या ताब्यात!

मुंडेंची पंकजा पोलिसांच्या ताब्यात!
www.24taas.com , झी मीडिया, पुणे

मुंबईतला सामूहिक बलात्कार आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी भाजपनं पुण्यात जोरदार आंदोलन केलं. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यक्रमात निदर्शनं करण्यात आली. आंदोलनानंतर आमदार पंकजा मुंडे-पालवे यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

भाजप आमदार पंकजा मुंडे-पालवे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गृहमंत्री आर.आर.पाटील अकार्यक्षम असून राज्याची कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजप आमदार पंकजा मुंडे पालवे यांनी केली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, August 25, 2013, 16:10


comments powered by Disqus