Last Updated: Wednesday, May 22, 2013, 17:31
www.24taas.com, झी मीडिया, पुणेपुणे रेल्वे स्थानकावर सध्या चलती सुरु आहे ती अनधिकृत तिकीट एजंटांची... रेल्वे स्थानकाच्या आवारातच अनधिकृत एजंटांचा तिकिटांचा काळा बाजार सुरु आहे. तीही राजरोसपणे... रेल्वे प्रशासनाला याची माहिती आहे. मात्र, रेल्वे पोलिसांवर जबादारी ढकलून ते मोकळे झालेत. त्यामुळे सामान्य प्रवाशी मात्र नडले जात आहेत...
पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य गेटसमोर अगदी काही पावलांवर तुम्हाला हे लोक बसलेले दिसतील... गाडी सुटायला अगदी काही तास बाकी असतील, तरी तुम्हाला या लोकांकडून आरक्षित तिकीट मिळू शकेल. फक्त तुमची तेवढे पैसे मोजायची तयारी असायला हवी.
कुठेही जाण्यासाठी एसी तिकीट हवं असेल तर, तिकीटाची मूळ किंमत आणि अधिक हजार रुपये मोजावे लागतील. तिकीटाची किंमत अंतरानुसार कमी जास्त होते. जर तुम्ही दक्षिणेत निघालात तर तिकीटाची मूळ किंमत अदिक हजार रुपये हा रेट.. पण हाच प्रवास दिल्लीकडचा असेल तर दुप्पट पैसे मोजावे लागतात. GFX OUT रेल्वे तिकीटांचा असा काळाबाजार सुरू असताना प्रवाशांना मात्र इच्छित ठिकाणचं तिकीट मिळत नाहीय.
एजंटसचा हा काळाबाजार सुरु आहे तो रेल्वे स्टेशनच्या मुख्य गेट समोरच.. इतकंच नाही तर रेल्वे पोलीस ठाणंही इथून हाकेच्या अंतरावर आहे. तरीही हा काळाबाजार खुलेआम सुरु आहे. कारवाईबद्दल विचारलं की रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलीस एकमेकांकडे बोट दाखवतात.
एजंटसचा हा काळाबाजार निश्चितच कुणाच्या तरी वरदहस्तानं सुरू असणार, हे नक्की.... रेल्वे प्रशासन आणि पोलीस यांना माहीत असूनही राजरोस हा काळा धंदा सुरू आहे. हा अड्डा उध्वस्त कधी होणार, याकडेच आता लक्ष लागलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, May 22, 2013, 17:31