Last Updated: Monday, May 20, 2013, 20:13
www.24taas.com, झी मीडिया, पुणेथेरगावमधल्या आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये एका भामट्यानं डॉक्टर असल्याचा बनाव करत एका महिलेचे दागिने पळवलेत.
डॉक्टर असल्याच्या बहाण्यानं त्यानं महिलेच्या मानेवर इंजेक्शन दिलं आणि त्याचवेळी तिचे दागिने पळवले. आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये रेखा मेहता ही महिला उपचारासाठी दाखल झाली होती. तिच्या रुममध्ये हा भामटा डॉक्टर शिरला. इंजेक्शन द्यायचं असं सांगून त्यानं तिला अंगावरचे दागिने काढायला लावले. आणि या भामट्यानं चक्क तिच्या मानेवर इंजेक्शन देत दागिने घेऊन पसार झाला.
एवढी गंभीर घटना घडूनही रुग्णालय प्रशासन मात्र याकडे गांभीर्यानं पाहात नसल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय. तर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, May 20, 2013, 20:12