‘एटीएम’ मशीन फोडलं, सुरक्षा रक्षकालाही मारहाण, broke ATM machine in pune

‘एटीएम’ मशीन फोडलं, सुरक्षा रक्षकालाही मारहाण

‘एटीएम’ मशीन फोडलं, सुरक्षा रक्षकालाही मारहाण
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुण्यातील कसबा पेठ पोलीस चौकी शेजारील दोन एटीएम मशीनची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही पोलीस चौकी पुण्याची ओळख असणाऱ्या शनिवारवाड्याशेजारीच आहे.

रविवावारी सकाळी सहा वाजल्याच्या दरम्यान दोन अज्ञात तरुणांनी दोन बॅंकांच्या एटीएम मशिनची तोडफोड केली. याशिवाय तेथे कामास असलेल्या सेक्युरिटीलाही या तरुणांनी मारहाण केली. कसबा पेठ पोलीस चौकीजवळ डीसीबी बॅंक आणि अॅक्सिस बॅंकांचं एटीएम मशिन आहेत. या एटीमवर दोन तरुण आले होते, मात्र त्यांचं एटीएम मशीन चालत नव्हतं. त्यामुळे त्यांची सुरक्षा रक्षकाशी वादावादी झाली. या वादावादीत त्या तरुणांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच जवळ पडलेल्या एका लोखंडी पाईपच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडण्यास सुरुवात केली.

यामध्ये अॅदक्सिस बॅंकेच्या एटीएम मशिनचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे तर डी.सी.बी. बॅंकेच्या एटीएम मशिनचे काही प्रमाणात नुकसान करुन तेथील सीसीटीव्ही कॅमेरा या तरुणांनी फोडलाय. हे दोन्ही तरुण अद्यापही फरार आहेत. तसंच एटीएमच्या सुरक्षा रक्षकांना लायसन्स देण्याचा मुद्दा ऐरणीवर आलाय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 30, 2013, 08:23


comments powered by Disqus