उत्तर आलं नाही म्हणून विद्यार्थ्याच्या तोंडात दिले चटके!, burn to student for not knowing answer

उत्तर आलं नाही म्हणून विद्यार्थ्याच्या तोंडात दिले चटके!

उत्तर आलं नाही म्हणून विद्यार्थ्याच्या तोंडात दिले चटके!
www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर

संगणकावर अधारीत विचारलेला प्रश्नाचं उत्तर देता न आल्यानं सहावीच्या विद्यार्थ्याला मारहाण करुन जीभेला चटके दिल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये घडलाय. याबाबत विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलीय. तर असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा शाळेनं केलाय.

एका प्रश्नाचे उत्तर आले नाही यशश्री अॅकेडमीमध्ये सहावीत शिकणा-या पवन रोहिडाची भयप्रद अवस्था झाली आहे. पवनला संगणकाबाबतच्या एका प्रश्नाचे उत्तर आले नाही, त्यामुळे नाराज झालेल्या शिक्षिकेनं त्याला संस्थेच्या अध्यक्षा अनुरीता शर्मा यांच्याकडे नेले. शर्मा यांनी यावेळी पवनच्या गालात 7 ते 8 फटके लगावलेच. त्याचबरोबर पवनच्या तोंडात काडीपेटी टाकून चटके दिले, असा आरोप त्याच्या पालकांनी केलाय.

यशश्री अॅकेडमीच्या संचालकांनी हे सर्व आरोप फेटाळलेत. घटना घडल्यानंतर तक्रार दाखल करण्यास 10 दिवस उशीर का झाला असा सवाल त्यांनी विचालाय. पवनच्या मेडिकल तपासणीनंतर या विषयावरचं सत्य बाहेर येईल. मात्र या निमित्तानं शाळेत दिल्या जाणा-या शिक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या तपासणीनंतर संस्थाचालिका दोषी आढळल्यास त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, September 16, 2013, 21:15


comments powered by Disqus