जैन साधकांना मारहाण, बस दिली पेटवून , Bus Burnt Of Jain Seekers in Solapur

जैन साधकांना मारहाण, बस दिली पेटवून

जैन साधकांना मारहाण, बस दिली पेटवून
www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर

सोलापूरमध्ये किरकोळ कारणावरुन जैन साधकांना जबर मारहाण झालीये. त्यांची बसही पेटवून देण्यात आली. सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावरील कोयना नगर येथे ही घटना घडलीये.

सांगलीचे हे साधक रामटेक येथे दीक्षा घेवून सांगलीला परत निघाले असताना हा प्रकार घडलाय. सहा साधकांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणात एका माजी नगरसेवकासह सहा जणांना अटक केलीय. सांगली येथील २६ जैन साधक रामटेक येथे जैन दीक्षा घेवून सांगलीकडे परतीस निघाले होते.

मंगळवेढा रस्त्यावर कोयनानगर येथून जात असताना एका ट्रँक्टरला ओव्हरटेक करताना ट्रँक्टरचा धक्का या मिनी बसला लागलाय या घटनेवरुन वाद वाढत गेला. ५० ते ६० लोकांचा जमाव जमला आणि त्यांनी या साधकांवर दगडफेक करीत मिनी बस पेटवून दिली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, August 10, 2013, 13:58


comments powered by Disqus