Last Updated: Thursday, February 20, 2014, 20:25
www.24taas.com, झी मीडिया, पुणे पुण्यात एका चोराने चक्क चोऱ्यांचं शतक केलंय. त्याचे शंभर गुन्हे करुन झाल्यावर १०१ वी चोरी करताना पोलिसांनी त्याला अटक केलीय.
जावेद रज्जाक शेख… पुणे पोलिसांनी नुकताच अटक केलेला आणि चोऱ्यांमध्ये सेंच्युरी ठोकणारा चोर... त्याच्या नावावर नुकतीच १०१ व्या चोरीची नोंद झालीय. ही चोरी करतानाच त्याला अटक झाली. पार्क केलेल्या कारमधून बॅग्स लंपास करण्यात जावेदचा हातखंडा... गेल्या तब्बल २२ वर्षांपासून जावेद हाच उद्योग करतोय. त्यासाठी त्यानं अनेकदा तुरुंगाची हवादेखील खाल्लीय... पण त्यानं हा उद्योग काही सोडला नाही, असं दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे सांगतात.
स्वारगेट, लष्कर आणि बंड गार्डन या तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येच जावेदनं बहुतेक चोऱ्या केल्या आहेत. चोरी करण्याच्या कामात जावेद मदतनीसही घ्यायचा... तेही पगार देऊन… पण हा पगारी साथीदार दरवेळी वेगळा असायचा.
जावेद सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. पुढे कदाचित त्याची तुरुंगातदेखील रवानगीदेखील होईल. मात्र, बाहेर आल्यावर तो पुन्हा चोरी करणार नाही. याची खात्री पोलीसही देऊ शकत नाहीत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, February 20, 2014, 20:25