प्रमोशनसाठी सीईओ वडील मुलीला पाठवत वरिष्ठांकडे! CEO Father sends his daughter of boss for promotion

प्रमोशनसाठी सीईओ वडील मुलीला पाठवत बॉसकडे!

प्रमोशनसाठी सीईओ वडील मुलीला पाठवत बॉसकडे!
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यात उघड झाली आहे. नोकरीमध्ये प्रमोशनसाठी स्वत:च्या मुलीला वरिष्ठासोबत शरीर संबंध ठेवण्याचा आग्रह मुलीच्या वडिलांनी केलाय.

तिच्या वडिलांसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पिडीत तरुणी उच्चशिक्षित आहे. तिचे वडील एका नामांकित कंपनीचे सीइओ आहेत. त्यांच्या बॉसशी संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप मुलीनं केलाय. वडील गेले तीन वर्षं मुलीवर बलात्कार करत होते. तसंच प्रमोशनसाठी बॉस आणि त्याआच्याल ग्राहकांकडेही तो मुलीला पाठवत होता. मुलीने या गोष्टीला नकार दिल्यास तिला तो बेदम मारहाणही करायचा. याहून वाईट म्हणजे हा प्रकार तिने आजोबांना सांगितल्यांनंतर त्यां नीही तिच्यालवर बलात्कार केला. पोलिसांनी याप्रकरणी तिच्याह आजोबांना अटक केली आहे. आजीनेही त्यांची साथ दिल्या चा आरोप पीडितेने केला आहे. मुलीच्या‍ तक्रारीनंतर पिता फरार आहे.

सुरूवातीला या प्रकारापासून बचाव करण्यासाठी मुलगी हॉस्टेलवर राहात होती. मात्र सुट्टीनिमित्त घरी आल्यावर पुन्हा तिला अत्याचारांना सामोरं जावं लागलं. मुलीची आई वडिलांच्या जाचाला कंटाळून यापूर्वीच विभक्त झाली होती. अखेर आईच्याच मदतीने मुलीने कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, July 30, 2013, 21:30


comments powered by Disqus