राष्ट्रवादीत भुजबळ अस्वस्थ, chagan bhujbal distressed in ncp

राष्ट्रवादीत भुजबळ अस्वस्थ...

राष्ट्रवादीत भुजबळ अस्वस्थ...
www.24taas.com, पुणे

आपल्याला पक्षात एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, असं म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षातील आपली अस्वस्थता जाहिररित्या व्यक्त केलीय.

ओबीसी असल्यामुळेच आपल्याला सर्व बाजूंनी टार्गेट केलं जातं आणि पक्षातले लोकही त्यात मागे नसतात, असं म्हणत छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा नाराजीचा सूर आवळलाय. महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पण, ‘मला एकटे पडण्याचा प्रयत्न होत असला तरी मी गप्प बसणाऱ्यांतला नाही. मी लढत राहणार अशी’ अशी आव्हानाची भाषाही भुजबळांनी केलीय.

नाशिकमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमातही भुजबळांनी हीच खंत व्यक्त केली होती. यामुळे राष्ट्रवादीतल्या भुजबळांच्या अस्वस्थतेबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालीय.

First Published: Wednesday, November 28, 2012, 16:20


comments powered by Disqus