बाळ चोरणाऱ्या पती-पत्नींना अटक, child robber arrested

बाळ चोरणाऱ्या पती-पत्नींना अटक

बाळ चोरणाऱ्या पती-पत्नींना अटक
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

तीन महिन्याचं बाळ चोरणा-या पती-पत्नीला स्वारगेट पोलिसांनी अटक केलीय. हे बाळ विकत घेणा-या 2 जणांना ताब्यात घेण्य़ात आलंय. तसंच अपहरण झालेल्या तीन महिन्याच्या बाळाचीही सुखरूप सुटका करण्यात आलीय.

रेखा पारधी परभणीहून आपल्या भावाला भेटण्यासाठी पुण्याला आल्या होत्या.. त्यावेळी अटक करण्यात आलेल्या मनीष आणि परेशा गांधी यांनी त्यांच्या तीन महिन्याच्या बाळाला घेऊन परेशानं पोबारा केला. रेखाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी मनीष आणि परेशा या दाम्पत्याला अटक केलीय. पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक बाब उघड झालीय.

ताब्यात घेण्यात आलेल्या नवीन आणि सुप्रिया गुंडीकुंडला यांना बाळ देतो असं गांधी दाम्पत्याने सांगितलं होतं. त्यासाठी तीन लाखांचा करारही झाला होता. गांधी दाम्पत्याने नव्वद हजार रुपयेसुद्धा गुंडीकुंडला यांच्याकडून घेतले होते.. मात्र अखेर स्वारगेट पोलिसांनी हा डाव उधळून लावलाय. सध्या बाळावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, November 3, 2013, 22:15


comments powered by Disqus