Last Updated: Sunday, October 13, 2013, 13:47
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूरतिरुपती इथल्या तिरुमल्ला देवस्थानकडुन करवीर निवासीनी महालक्ष्मीला मानाचा शालु अर्पण करण्यात आलाय. तिरुमल्ला देवस्थानच्या सदस्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडं हा शालु सुपुर्द केलाय.
आज दस-याच्या दिवशी हा शालु महालक्ष्मी देवीला परिधान केला जाणार आहे. शारदीय नवरात्रोत्सवामध्ये अष्टमीला अनन्य साधारण महत्व आहे. या दिनाचं औचित्य साधुन तिरुमल्ला देवस्थानकडुन महालक्ष्मी देवीला मानाचा देण्याची गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. करवीर निवासीनी महालक्ष्मी ही तिरुपतीची पत्नी असल्यामुळं दरवर्षी तिरुमल्ला देवस्थान समितीकडुन हा शालु येतो.
शनिवारी सकाळी हा शालु पारंपारीक वाद्याच्या गजरात आणि भक्तांच्या उत्साहात महालक्ष्मी मंदिरात आणण्यात आला.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, October 13, 2013, 13:47