मुख्यमंत्र्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांवर टीका CM criticises IAS officers

मुख्यमंत्र्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांवर टीका

मुख्यमंत्र्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांवर टीका
www.24taas.com, पुणे

प्रशासकीय अधिकारी जायला तयार नसल्यामुळे मराठवाडा, विदर्भ, खानदेश या विभागातील विकास रखडल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. अधिका-यांची अशी रिक्त राहणारी पदं हे या विभागांचा विकास न होण्यामागील महत्वाचं कारण असल्याचं त्यांनी म्हटलंय.

पुण्यात नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी या महसूल विभागातील अधिका-यांच्या संघटनेचं अधिवेशन पार पडलं. त्यात बोलतांना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अधिका-यांना हे खडे बोल सुनावले.

महसूल खात्यातील सर्वच अधिका-यांना पुणे विभागात पोस्टिंग हवं असतं. मराठवाडा, विदर्भ, खानदेश या विभागात जायला कोणी तयार नसतं. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही अशा अधिका-यांना कानपिचक्या दिल्या.

First Published: Sunday, December 2, 2012, 23:34


comments powered by Disqus