मारहाण, काँग्रेसच्या नगरसेवकाला सक्तमजुरीची शिक्षा, Congress Corporater Decorating by Court

मारहाण, काँग्रेसच्या नगरसेवकाला सक्तमजुरीची शिक्षा

मारहाण, काँग्रेसच्या नगरसेवकाला सक्तमजुरीची शिक्षा
www.24taas.com, कोल्हापूर

कोल्हापूरचे नगरसेवक प्रदीप उलपे याला सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कोल्हापूरच्या काँग्रेसच्या नगरसेवकास सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

नगरसेवक प्रदीप उलपे यांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावल्याने स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. २००६च्या पालिका निवडणुकीत मारहाण प्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप उलपे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याची सुनावणी गेले काही वर्ष सुरू होती. आज मात्र याचा निकाल आल्याने नगरसेवक प्रदीप उलपे याला सक्तमजुरीची शिक्षा सुनावल्याने त्याला चांगलाच धक्का बसला आहे. काँग्रेसचे नगरसेवक असल्याने विरोधक आता त्यावर रान उठवणार हे मात्र नक्की. जिल्हा सत्र न्यायालयानं ही शिक्षा ठोठावली आहे

First Published: Saturday, November 3, 2012, 17:51


comments powered by Disqus