काँग्रेसने कलमाडींना दूर ठेवले, समर्थकांना दिलाय इशारा, Congress put away Suresh Kalmadi

काँग्रेसने कलमाडींना दूर ठेवले, समर्थकांना दिलाय इशारा

काँग्रेसने कलमाडींना दूर ठेवले, समर्थकांना दिलाय इशारा
www.zee24taas.com, झी मीडिया, पुणे

दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत घोटाळा केल्याचा ठपका ठेवलेल्या सुरेश कलमाडी यांना काँग्रेसने चार हात दूर ठेवले आहे. त्यांना उमेदवारी न देता पंतगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजीत यांना पुण्यातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कलमाडी बंडाच्या पवित्रात आहेत. त्यांनी पुण्यात समर्थकांची बैठक घेतली. दरम्यान, कलमाडी समर्थकांनी पक्षविरोधी काम केल्यास, कारवाई करण्याचा इशारा हर्षवर्धन पाटल यांनी दिलाय.

पुण्याचा एकेकाळचा सबसे बडा खिलाडी, काय भूमिका घेणार, याकडे पुणेकरांचं लक्ष लागलं होतं. मला भाजप सोडून इतर पक्षांनी संपर्क केलाय. मात्र मी अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असं सुरेश कलमाडींनी स्पष्ट केलं.

त्याचबरोबर कलमाडींच्या पत्नीला उमेदवारी न मिळाल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. आज कलमाडी हाऊसमध्ये कलमाडी समर्थकांची बैठक झाली. सध्या मी फक्त पन्नास टक्के कार्यकर्त्यांशीच चर्चा केलीय, आणखी कार्यकर्त्यांनी चर्चा करुन मग निर्णय घेणार असल्याचं कलमाडींनी म्हंटलंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, March 21, 2014, 23:18


comments powered by Disqus